उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कामावर कार्यरत असताना कर्मचारी अशोक बाबुराव सुरडकर यांना अज्ञात व्यक्तीने येऊन मारहाण केली करून जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच्या निषेधात  आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक एक तास काम बंद आंदोलन करून निषेध करण्यात आला.

दरम्यान असेच मारहाणीचे प्रकार सतत घडत असेल तर येणाऱ्या काळात आरोग्य संघटना कायमस्वरूपी काम बंद आंदोलन करेल असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय,जिल्हा अधिष्ठता,जिल्हा शासकीय वैदकीय महाविद्यालय यांना  आरोग्य संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

 यावेळी आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, पीडित आरोग्य कर्मचारी अशोक सुरडकर, बाबा पवार संजय भुतेकर कपाटे भारत मामा रवी शितोळे मेंढेकर जाधव वाघमारे शितोळे श्रीमती शितोळे आदी उपस्थित होते.

 
Top