उमरगा / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले, येथील दुय्यम निबंधक राजाभाऊ उर्फ बापू दत्तोबा पवार वय ५३ वर्ष यांचे मंगळवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगी असा परिवार आहे. बापू नावाने परिचित असलेले राजाभाऊ यांचे कुटुंब या पूर्वी अनेक वर्ष उमरग्यात वास्तव्यास होते. सध्या ते मुळ गावी उस्मानाबाद येथे रहात होते. येथील रजिस्ट्री कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणुन चार महिन्यापूर्वी रुजू झाले होते. मंगळवारी सकाळी गुंजोटी रस्त्यालगतच्या वसुंधरा कॉलनीत ते किरायाच्या घरात रहात होते. मंगळवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.  उस्मानाबाद येथील कपिलधारा स्मशानभूमीत सांयकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top