उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

अधिकाऱ्यांनी कामा बाबत कोणती ही तडजोड करू नये, कामाचा दर्जा राखला गेलाच पािहजे, सरकारचे काम दाखविण्यासाठी कामे गतीने करा, असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी कांही अधिकाऱ्यांची दिशा समितीच्या बैठकीत झाडाझडती घेतली. 

सोमवार दि.१३ जून रोजी जिलास्तरीय दिशा समितीची बैठक दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती. प्ररंतु बैठक दुपारी ३ वाजता सुरू झाली. बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, िजल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, मनरेगा, प्रधानमंत्री उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधील कांही कामाबाबत खासदार ओमराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तीन बैठका नंतर ही कामे होत नसतील तर संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करा तर आमदार कैलास पाटील यांनी रस्ता दुरूस्ती व कामे कागदावर केलेली दाखतात. प्रत्येक्षात लोक आमच्याकडे येऊन तक्रार करतात. आम्हाला काय तुम्ही मुर्ख समजता का? असे म्हणत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तलाट्यांना नोटीस काढून या योजनेपासून कोणी ही गुरजूवंत वंचित राहू नये, असे आदेश दिले. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना असो अथवा इतर वंचितांच्या पगारी ऑनलाईन किंवा घरपोच देता येतील का हे पाहावे, मनरेगा बाबत फळबाग योजना, विहीरी, गोठा, शेततळे, शेतरस्ते, मातोश्री योजना या लोकसंख्याप्रमाणात लाभार्थी निवडा, असे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या कामामधुन सरकारचे काम दिसुन येणार आहे. परंतू अधिकारी वर्ग चांगले काम करत नसल्याने खासदार व आमदार कैलास पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नेमक्या अडचणी काय आहेत, फायली कोठे थांबतात त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश ही दिले.  प्रधानमंत्री आवास योजनेबाबत उस्मानाबादचे मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांचा उल्लेख नायक सिनेमातील मुख्यमंत्र्याप्रमाणे तुमचे कामे चालू आहेत. मग प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मागे का ? असा प्रश्न खासदार ओमराजे निंबाळकर यंानी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी यांनी कांही प्लॉट बाबत अडचणी आल्यामुळे तांत्रीक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर कैलास पाटील यांनी फाईल मंजुर करताना तांत्रिक बाबी पाहिल्या नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीत इतर अन्य विषयावर चर्चा झाली. 

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते. 


 
Top