उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील नाटय शास्त्र व लोककला विभाग उस्मानाबाद येथे डॉ. गणेश शिंदे लिखीत पाऊस नावाचे नाटक विद्यापीठातील विद्यार्थी कलाकारांनी सादर केले. त्याचे दिग्दर्शन सोहन कांबळे, संगीत सोमनाथ भंडारे, प्रकाश योजना गणेश शेंडगे, नौपत्य, विशाल रणदिवे, रंगमंच व्यवस्थापन योगेश घाडगे, रंगभूषा अश्विनी जगताप यांनी केले.

    यातील कलावंतांच्या भूमिका सोहन कांबळे, अविनाश चंदनकर, अक्षता किरकसे यांनी वटवल्या आहेत. या नाटकास विभाग प्रमुख श्री. डॉ. गणेश शिंदे, डॉ. अमजद सय्यद, डॉ. उषा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

    या नाटकामध्ये केवळ योग्य वेळी एकमेकांनी भावना व्यक्त न केल्यामुळे प्रेयसीचे लग्न दुस·याबरोबर लावून दिले जाते व नंतर पाऊस कोसळत असताना प्रियकर पावसात आसरा शोधण्यासाठी नेमका प्रेयसीच्या घराचे दार ठोठावतो. नंतर घरामध्ये दोघातील संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. सहा महिन्यापासून घराचे भाडे न दिल्यामुळे घरमालकाने धमकावणे, प्रियकराने प्रेयसीला माहिती न होताच घरभाडे देणे, प्रेयसीने प्रियकाराला मदत  म्हणून स्वत:चे दागीने देणे, दोघांनीही एकमेकांना लिहिलेले प्रेमपत्र वाचणे, अशा पध्दतीने पुढे काय होते ? अशी उत्कंठता प्रेक्षकांना नाटक पाहत सतत होत राहते. प्रेमभावनेचा तरल अविष्कार या नाटकात दाखवला गेला.

    नाटयशास्त्र विभागातील परिक्षेचा भाग म्हणुन हे नाट¶प्रयोग प्रत्येक शुक्रवारी सादर केले जात आहेत. उस्मानाबाद परिसरातील नाटक रसिकांना ही मेजवाणीच आहे.

 
Top