उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एक जिल्हा एक उत्पादन या अतंर्गत उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यात तीर्थबुदुृक येथे शेळी-मेंढी पालन याचे प्रशिक्षण केंद्र त्याच प्रमाणे संशोधन केंद्र मोठ्या प्रमाणत चालू करून जिल्हयात एक जिल्हा एक उत्पादन या द्वारे मदत करणार असल्याची मािहती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांनी दिली

डॉ.कराड शनिवार दि. १८ जून रोजी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन बँकेचे अधिकारी आदींची बैठक घेतली. जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितिसंह पाटील, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.दुष्यंत कुमार गौतमजी  उपस्थित होते. पुढे बोलताना डा.कराड यांनी या आकांक्षीत जिल्हयाची जबाबदारी प्रधानमंत्री यांनी माझ्यावर दिली असून, जिल्हयाच्या विकासासंदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला आहे. निती आयोगाच्या पाच तत्वानुसार शिक्षण, आरोग्य, कृषी व पाणी, अर्थकारण व पायाभूत सूविधा यावर आमचा भर असणार आहे.िनतीआयोगाचे अधिकारी रामानंद राजू  हे आजच्या बैठकीला उपस्थित होते. 

 जिल्ह्यात मोठा उद्योग आणण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे सांगून डॉ. कराड यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या महारैल मधुन सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गांचे काम करण्यात येईल, असे सांगितले. तुळजापूर तिर्थक्षेत्र चांगल्या प्रकारे विकसीत व्हावे, या उद्देशाने प्रसाद योजनेतंर्गत आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे टेक्नीकल  टेक्सटाईल पार्क विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एनपीटीसी मार्फत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ही त्यांनी आश्वासन िदले. यावेळी त्यंानी केद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिलींद पाटील, दत्ता कुलकर्णी आदी उपस्थिती होती. 

 
Top