उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा उस्मानाबाद जिल्हा संस्कार भारती समितीच्यावतीने पुष्पगुच्छ व संस्कार भारती दैनंदिनी २०२२-२०२३ सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी देवगिरी प्रांत चित्रकला सह विधा प्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ दगडोबा वाघ जिल्हाप्रमुख श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर , जिल्हाकोष प्रमुख अरविंद पाटील, जिल्हा नाट्य विधाप्रमुख धनंजय कुलकर्णी आदि जिल्हा पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सत्कार मनोगतात डॉ. कराड म्हणाले कलावंतांसाठी हा आयाम संघप्रणित संस्कार भारती ही राष्ट्रीय पातळीवर भारतीय कला परंपरा , संस्कृती जतन करण्यासाठी राष्ट्र भक्तीने प्रेरित होऊन कार्य करते . याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंड नाईक,माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी , नारायण नन्नवरे, दिपक आलुरे आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top