तेर / प्रतिनिधी-

 वारकरी  साहित्य परिषदेच्या वतीने” झाडू संतांचे मार्ग”उपक्रमास उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री. संत गोरोबा काका यांच्या मंदिरात प्रारंभ करण्यात आला.

या उपक्रमासाठी विविध गावांतून दिंडयाचे आगमन श्री.संत गोरोबा काका यांच्या मंदिरात झाले.उपस्थित वारक-यानी मंदिर व परिसरात स्वच्छता करून” झाडू संतांचे मार्ग”उपक्रमास प्रारंभ केला.यावेळी मोहन अप्पा वाघुलकर शोभाताई लंगडे,श्रीहरी चौरे यांनी आपले विचार व्यक्त केले तर प्रास्ताविक ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ यांनी केले तर सूत्रसंचलन अॅड.अंगद नाईकवाडी. यांनी केले तर आभार  कुमार बायस यांनी मानले.यावेळी साहेबराव सौदागर, बालाजी भक्ते, नवनाथ पांचाळ,माधव मगर, व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top