उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील  पदविका प्रवेश  प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बारावीनंतर एम .सी .व्ही .सी. अभ्यासक्रम पूर्ण  केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. दहावी नंतरच्या तीन वर्षांचा पदविका अभियांत्रिकीचा हा अभ्यासक्रम असतो.  दहावी परीक्षा उत्तीर्ण दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल लागण्यापूर्वीच या प्रवेशासाठी नोंदणी करू शकतील. नोंदणीही ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाऊनही प्रवेश प्रक्रिया करता येऊ शकते. मागील तीन वर्षापासून पदविका प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत सुलभ अशी प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. सुविधा केंद्रांवर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी कोणतीही  फी  आकारली जात नाही. उस्मानाबाद येथील   शासकीय तंत्रनिकेतन येथे आगामी वर्षातील पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्राची तसेच सर्व समुपदेशन केंद्राची सुरुवात झाली  आहे. या सुविधा केंद्राचा क्रमांक FC2018 असा आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर  प्रत्यक्ष तपासणीसाठी  अर्ज या सुविधा केंद्रावर उपलब्ध सर्व मूळ कागदपत्रांसह तपासून निश्चित करून घ्यावीत. ई- तपासणी स्वीकारली असल्यास वेळोवेळी ऑनलाईन येणाऱ्या त्रुटीची पूर्तता करावी. ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 30 जून 2022 पर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी hhttps://poly22.dte.maharashtra.gov.in/diploma22 या संकेत स्थळास भेट देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ.सु.ल. अंधारे यांनी केले आहे.

 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :

 सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी जन्म प्रमाणपत्र इयत्ता दहावीचा निर्गम उतारा असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. इतर मागास वर्ग विशेष मागासवर्ग तसेच भटक्या जाती व जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र सोबतच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र  (मार्च २०२३ पर्यंत चालणारे )असणे आवश्यक आहे. याशिवाय आदिवास प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार अपंगाचा दाखला, संरक्षण दलात पालक असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल  प्रवर्गासाठी चे प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक  यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र. वेगवेगळ्या वर्गवारी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रांची तपशीलवार माहिती प्रवेश पुस्तिकेत दिलेली आहे. सदरील पुस्तिका ऑनलाइन http://www.dtemaharashtrea.gov.in  येथे उपलब्ध आहे असेही शासकीय पॉलिटेक्निक  संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


 
Top