उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील बेंबळी येथील सामाजिक उपक्रम राबविणार्‍या ग्रामसेवा समूहाचे दिवंगत सदस्य सचिन व्हनसनाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामसेवा समूहातील सदस्यांसह त्यांच्या विविध क्षेत्रातील मित्रमंडळींनी रक्तदान करून श्रध्दांजली अर्पण केली.

बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी सचिन व्हनसनाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामसेवा समूहाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. व्हनसनाळे यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रध्दांजली अर्पण करून शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी ग्रामसेवा समूहाचे शहानवाज शेख, प्रा. धनंजय भोसले, चंदन भडंगे, शासकीय रक्तपेढीचे कर्मचारी महिपाल खाडप, विठ्ठल कांबळे, विनय कुंभार, नीता दांडेगावकर, भारत नागरसोगे उपस्थित होते.

शिबिरात युवराज निकम, सचिन मोटे, प्रमोद वाघे, केशव नळेगावकर, रोहित निकम, अ‍ॅड. अमोल गाडे, गणेश बनसोडे, नागेश सोनटक्के, अक्षय नळेगावकर, प्रदीप खापरे, रवी काशीद, नागेश शहा, प्रल्हाद चौधरी, राहुल मुंगळे, चैतन्य नळेगावकर, प्रा. धनंजय भोसले, आकाश पाटील, योगेश ढोबळे, अजय परदेशी, शरद घोडके, अर्जून बिराजदार, विष्णू बागल, सागर खापरे, शुभम चव्हाण, सुरज तांबे, महेश सौदागर, हर्षवर्धन पाटील, रंगनाथ गुंड, नारायण मुळे, ऋषिकेश व्हनसनाळे, प्रशांत कदम, राहुल गिरवलकर, महेश सोनटक्के, दत्तात्रय ढाळे, अक्षय घाडगे, केशव माळी, विलास देडेकर आदी 38 जणांनी रक्तदान करून सचिन व्हनसनाळे यांना अभिवादन केले. शिबिरात जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवा समूहाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


 
Top