उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येडेश्वरी मंदीर परिसरात चहाचे हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेस चाकूचा धाक दाखवून 3 जणांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना येरमळा येथे येडेश्र्वरी मंदिर ते गावात येणाऱ्या रस्त्यावर सागर हॉटेल जवळ बुधवार ( दि.२२ ) रोजा रात्री सव्वा आठ वाजता घडली. दरोडेखोर आणि महिला यांच्यात झालेल्या झटापटीत महिलेच्या पोटावर व हाताच्या मनगटावर गंभीर दुखापत झाली असून ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविले आहे.या धक्कादायक प्रकारामुळे येरमाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसात गुरुवार ( दि..२३) रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, येरमाळा येथील लक्ष्मी रावसाहेब बारकुल (वय ७०) या महिलेचे चहाचे हॉटेल येडेश्वरी मंदीर परीसरात असून व्यवसाय करुन उपजीवीका भागविते. दिवसभर चहाचे हॉटेलचा व्यवसाय करून बुधवार (ता.२२) संध्याकाळी आठ वाजेच्यां सुमारास महिलेच्या पोटात दुखत असल्याने येरमाळा गावात तपासणीसाठी नातु विनोद चंद्रकांत बारकुल दुचाकीवरून क्रमांक MH25AT8354 निघालो असता, या मार्गावरील सागर कसबे यांचे हाँटेल पासुन पुढे तीस मीटर अंतर वळणावरुन जात असताना रात्री सव्वा आठ वाजता मोटारसायकल चे पाठीमागुन एका दुचाकीवरून तिघेजण महिलेच्या दुचाकीला चिकटुन दुचाकी घेवुन तिघेजण नातु विनोदच्या अंगात असलेले जॅकेट धरुन ओढत होते.दुचाकी उभा कर असे म्हणत होते. नातुने दुचाकी उभा केली त्यावेळेस अज्ञात तिघा पैकीं एका व्यक्तीच्या हातात चाकु होता. चाकुचा धात दाखवुन नातुला पैसे काढ असे म्हणत होते.त्यावेळी नातु मदतीसाठी लोकांना आवाज देत होता. मात्र याठिकाणी कोणीच मदतीला आले नाही.दरोडेखोर दारु पिलेले होते. नातु विनोद याला धक्का बुक्की करु लागल्याने तो तेथुन पाठीमागे असेलेल हॉटेल कडे निघुन गेला.

   त्यावेळी दुचाकीवरून तिघा पैकी दोन चोरटे त्याचे पाठीमागे गेले व एक चोरटा हा महीलेजवळ आला व मारहाण करु लागला त्यावेळी आरड ओरड ओरडत करून मारहाण करु नका असे म्हणाले. चोरट्यांच्या हातातील चाकु दाखवुन मला म्हणाला की तु ओरडु नकोस नाही तर तुला चाकु मारतो असे म्हणुन त्याने त्याच्या हातातील चाकु पोटावर मारत असताना तो चाकु मी माझे दोन्ही हातानी धरला त्यामुळे डाव्या हाताच्या मनगटाजवळ जखम होवुन धक्काबुक्कीत माझे पोटावर पण चाकुची जखम झाली आहे. त्या चोरट्याला तु मला मारहाण करु नको तुला काय घ्यायचे आहे ते घे असे म्हणाल्यावरुन त्याने महिलेच्या उजव्या कानातील अर्धा ग्रॅम सोन्याचे फुल, गळ्यातील तीन ग्रॅम चे मणी मंगळसुत्र,साडेपाच ग्रॅम चे सोन्याचे मणी असलेले गंठण असे एकुन ४० हजार रुपयाचा ऐवज जबरीने चोरुन नेहले. त्या अज्ञात तीन चोरट्यापैकी एक सडपातळ, उंच, काळा सावळा तसेच चोरट्यांच्या सोबत असलेले काळ्या सावळ्या रंगाचे व एक जाड व बुटका होता. तिन चोरट्याना समोर हजर केल्यास ओळखते असे महिलेने येरमाळा पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे..

   या प्रकारामुळे येरमाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरीकातून होत आहे. तसेच मंदिर परिसरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची कुजबूज नागरिकांतून एकाववास मिळत आहे .


 
Top