उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेलंगणा राज्याच्या महिला व बालकल्याण व आदिवासी कल्याण मंत्री सत्यवती राठोड या उस्मानाबाद जिल्ह्यातील उपक्रमशील व आदर्श मॉडेल अंगणवाडी केंद्रांचा अभ्यास व पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.

मंत्री राठोड या दि. २६ व २७ जून हे दोन दिवस अभ्यास करणार आहेत. त्यांच्या समवेत महिला व बालकल्याण विभागाच्या संचालिका केआरएस लक्ष्मीदेवी, युनिसेफच्या राज्य पोषण सल्लागार व्ही. शिवलकर हे असणार आहेत या अभ्यास दौऱ्यात उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील आदर्श मॉडेल अंगणवाड्या, अंगणवाडीतील विविध उपक्रम तसेच आयएसओ मानांकीत अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी कामाला लागले आहेत.


 
Top