उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भूम तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था तसेच पाथरूड ते ईट रस्त्याची झालेल्या निकृष्ट कामकाजाबद्दल पाथरूड व परिसरातील सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ यांच्या वतीने जवळपास एक तास तुळजापूर-नगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दम्यान लेखी व तोंडी आश्वासन नागरिकांना देऊन आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली.

 नागरिकांनी त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात घेऊन त्या निवेदनावर मुख्य कार्यकारी अभियंता,सामाजिक बांधकाम उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांची स्वाक्षरी केलेली प्रत ताब्यात घेऊन,त्या बाबी सर्वासमोर वाचून आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात परिसरातील सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ यामध्ये डॉ.चेतन बोराडे,प्रा.तानाजी बोराडे सर,रामकिसन गव्हाणे,समाधान आप्पा बोराडे,सोमनाथ गावडे,विशाल गव्हाणे,हरिदास बोराडे,निलेश बोराडे सर,आकाश शेळके,राजपाल बोराडे,प्रदीप साठे,राजाभाऊ खरात,भाऊसाहेब बोराडे,सचिन चौधरी,गणेश विर,बालाजी बोराडे,दिलीप बोराडे,अंकुश बोराडे,नाना गव्हाणे,ग्रामपंचायत सदस्य,शिवाजी तिकटे,गणेश तीकटे,लहू तिकटे,दत्तात्रय पवार, तानाजी पवार,अर्जुन बोराडे,राज भूषण बोराडे,प्रदीप शेळके,सतीश महानवर,प्रशांत गिरी,लक्ष्मण नेरे,नवनाथ नेरे,कुंडलिक माने तसेच परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top