उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 दिवशी झाला. महाराष्ट्राच्या आणि प्रकारांतरने भारताच्या  इतिहासातील हा दिवस कुणीही विसरणार नाही असाच आहे.

 याच अनुषंगाने आज राज्याभिषेक दिनानिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती,उस्मानाबाद आयोजित राज्यभिषेक सोहळा कार्यक्रमात उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आतिषबाजी करत मावळ्यांना पेढे भरवत,घोषणांचा जयघोष करत अति उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी प्रमूख अतिथी संपूर्ण भारतात उस्मानाबादची मान अभिमानाने उंचविणाऱ्या उस्मानाबाद  तालुक्यातील हिंगळजवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.कमल ताई कुंभार होत्या.त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

 कमल ताई कुंभार यांचे स्वागत राम मुंडे अध्यक्ष मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, उस्मानाबाद यांनी सन्मान चिन्ह देऊन केले.त्यानंतर कमल कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी आपला जीवनप्रवास सांगितला.  नारी शक्तीला मान देऊन सोहळा संपन्न केला त्याबद्दल मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उस्मानाबाद चे सर्वत्र कौतुक होत आहे.

 यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील,राजसिंहा राजेनिंबाळकर,अग्निवेश शिंदे, पंकज पाटील,बलराज रणदिवे,अनंत जगताप, भालचंद्र कोकाटे, योगेश सोन्ने पाटील,अमोल पडवळ, शिवाजी चव्हाण, प्रसाद राजमाने निंबाळकर भाऊ ,आकाश तावडे, कुणाल निंबाळकर, महादेव माळी, प्रमोद कोराळे, पवन सूर्यवंशी, असलम सय्यद, आनंद वीर, गणेश उंबरे ,लखन देशमुख, सौरभ ढोबळे, लिंबराज डुकरे ,नाना घाडगे खंडू राऊत, बबलू राऊत,प्रितम मुंडे,महेश उपाशे,संकेत सूर्यवंशी शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top