उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर च्या पदवीधर अधिसभा निवडणूक (सिनेट) चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एक जबाबदार पदवीधर म्हणून अभ्यास आणि दूरदृष्टी असलेले प्रतिनिधी अधिसभेवर निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी करताना आपणास कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून युवासेनेच्या वतीने ही नोंदणी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रथम पदवी, रहिवाशी पुरावा (आधार/इलेक्शन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/लाईट बिल/पासपोर्ट व त्याचा क्रमांक) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच नावात बदल असल्यास नाव बदलाच्या पुराव्याची गॅझेटची कॉपी किंवा लग्नपत्रिका व विद्यापीठाने प्रकाशित केलेला अंडरटेकिंग फॉर्म फोटो आणि स्वाक्षरीसह भरून द्यावा. सर्व कागदपत्रे ही मतदारांनी स्वतःच्या स्वाक्षरीने सेल्फ अटेस्टेड करावयाची आहेत.

यापूर्वीच्या मतदार यादीतील नावे या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने नवीन नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी आवश्यक असणारा फॉर्म व अंडरटेकिंग फॉर्म खासदार संपर्क कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स,धाराशिव येथे उपलब्ध आहे किंवा आपण आपल्या विभागातील आमच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तो उपलब्ध करून घेऊ शकता असे सांगत जास्तीत जास्त मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा सरपंच अॅड.संजय भोरे यांनी केले आहे. 

 
Top