उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहु येथे संत तुकाराम शिळा मंिदराचा भव्य उद्घाटन कार्यक्रम मंगळवार दि.१४ जून रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करू न देता त्यांचा अवमान करण्यात आला. या प्रकरणी  उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवार दि. १५ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

देहु येथे झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणे क्रमप्राप्त होते. परंतू कार्यक्रम पत्रिकेत आपले भाषण नसल्याचा उल्लेख करण्यात आला. देहु येथील मंदिर संस्थान ने हा कार्यक्रम प्रधानमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या सूचनानुसार ठरविल्याचे सांगितले, अशी मािहती राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन बागल व अमित शिंदे माध्यमासमोर बोलताना सांगितले. अजित पवार यांना बोलू न देणे म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. 

या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, मसुद शेख, महिला काँग्रेसच्या मनिषा राखुंडे, सचिन तावडे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top