उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद येथील दत्ता शिंदे, रामा‍ शिंदे, देवानंद शिंदे, नितीन शिंदे, लक्ष्मण‍ शिंदे यांच्या व केशेगाव ग्रामस्थ- बबन दशरथ शिंदे यांच्यात शेतातील कॅनालच्या पाण्यावरुन वाद आहे.यातून शिंदेवाडी येथील नमूद लोकांनी केशेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बबन शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. यावेळी बबन यांच्या बचावास आलेला त्यांचा मुलगा- सागर यांसही नमूद लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बबन शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत बेंबळी पोलीस ठाणे :येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top