तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर उस्मानाबाद रस्तावर लमाणतांडा नजीक स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरुणांना कंटेनरची धडक बसुन झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना  बुधवार दि. १५रोजी दुपारी १.३०वा सुमारास घडली.

 या बाबतीत अधिक माहीती अशी की,  पुजारी कैलास पवार व दत्ता जगताप हे स्कुटीवरुन जेवणाचा डबा आपसिंगा रोडवरील घरातुन आणण्यासाठी जाताना लमाणतांड  जवळ कंटेनरने जोराची धडक दिल्याने यात  तरुणांचा जागीच मुत्यु झाला .

 अपघात एवडा भीषण होता की या दोघांचे मृतदेहचे तुकडे रस्त्यावर छिन्नविछन्न अवस्थेत पडले होते. यांच्या मृतदेहाच्या मासांच्या तुकड्यावर कावळे बसुन चोंच मारुन ते खात असल्याचे भयावह दृश्य यावेळी दिसुन आले. अखेर एक तासानंतर यांच्या मृतदेहावर गमजे टाकल्याने त्यांच्या मृतदेहाची होणारी विटंबना थांबली.

 
Top