उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ भूम येथे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी  सावंत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील  भूम शहरात मोठी रॅली काढून घोषणा दिल्या. सावंत यांना मंत्रिपद मिळाले नाही तसेच स्थानिक राष्ट्रवादी त्रास देत असल्याच्या व्यथा शिवसैनिक व समर्थकांनी मांडल्या . सावंत जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण, आम्ही सदैव तुमच्या सोबतचा हुंकार देत हे कार्यकर्ते एकवटले व रस्त्यावर उतरले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,भूमचे नेते संजय नाना गाढवे,शिवसेनेचे जिल्हा समन्व्यक तथा माजी सभापती दत्ता साळुंके,परंडा तालुका प्रमुख अण्णा जाधव, युवासेनेचे परंडा तालुका प्रमुख राहुल डोके, माजी उपसभापती बालाजी गुंजाळ,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख, महिला आघाडीच्या अर्चना दराडे उपस्थित होत्या.


 
Top