तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात मंगळवार दि.१४रोजी वटपोर्णिमा सण  पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला.मंगळवारी आलेल्या वटपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी देवीदर्नशनार्थ मोठी गर्दी केली होती.

 आज शहरातील कमानवेस भागातील डुल्या हनुमान मंदीरासमोरील वडाचा  झाडाचे पुजन करुन वडास सात फेरे मारुन वीस वर्षापासुन ते पंचाहत्तर वर्षाचा सुवासनीनी वडपुजन करुन वटपोर्णिमा साजरी केली .तसेच शहरातील जुन्या कन्या शाळासह जिथेजिथे वडाचे वृक्ष आहेत त्याचे पुजन करण्यासाठी सुवासनी महिलांनी मोठी गर्दी केली होती. तुळजापूर तालुक्यात गावोगावी शेतशिवारातील वडाचे पुजन करुन वटपोर्णिमा सण साजरा करण्यात आला. 

 
Top