तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील माळुंब्रा गावचे सुपुञ  शहीद जवान कै. दत्ता लक्ष्मण वाघमारे यांच्यावर शहीद जवान कै. दत्ता वाघमारे अमर रहे अशा जयघोषात माळुंब्रा येथे दुपारी साडेतीन वाजृता साश्रुनयनाने  हजारो लोकांच्या उपस्थितीत शासकीय  इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान कै. दत्ता लक्ष्मण वाघमारे यांना सेवेत असताना  पुण्यात रविवार दि १२ रोजी दुपारी अडीच वाजता हदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्याचा मृतदेह सोमवारी  दुपारी तीन वाजता गावात आणल्यानंतर त्यांच्यावर शासकीय  इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पुञ अजय यांनी अंत्यसंस्कारचा विधी केला. यावेळी नायब तहसिलदार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तामलवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. यावेळी मल्हार पाटील, अण्णा लोंढे,  गजानन वडणे, आनंद कंदले सह अनेक मंडळी उपस्थितीत होते.

 
Top