परंडा / प्रतिनिधी-

 मुदत संपलेल्या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १० प्रभागातील प्रभाग निहाय आरक्षण सोमवारी दि.१३ रोजी येथील तहसिल कार्यालयात लहान मुलाच्या हाताने आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये ९ सर्वसाधारण ८ सर्वसाधारण महिला तर अनुसूचित जाती १ पुरुष ,२ अनुसूचीत जाती महिला असे १० प्रभागातून २० जागा साठी आरक्षण उपजिल्हाधिकारी शुभांगी अंधारे यांनी जाहीर केले. तसेच १५ ते २१ जून २०२२ या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील अशी घोषणा  निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.

     परंडा नगर परिषदेच्या  सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सदस्यपदांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे , मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली नायब तहसिलदार उबाळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. 

यामध्ये प्रभाग १ अ अनुसूचित जाती महिला ब पुरुष, प्रभाग २ अ सर्वसाधारण महिला, ब पुरुष, प्रभाग ३ अ सर्वसाधारण महिला ब पुरुष,  प्रभाग क्रमांक ४ अ सर्वसाधारण महिला ब पुरुष, प्रभाग क्रमांक ५ अ सर्वसाधारण महिला ब पुरुष, प्रभाग क्रमांक ६ अ अनुसूचित जाती पुरुष ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ७ अ सर्वसाधारण महिला ब पुरुष, प्रभाग क्रमांक ८ अ सर्वसाधारण महिला ब पुरुष, प्रभाग क्रमांक ९ अ सर्वसाधारण महिला ब पुरुष, प्रभाग क्रमांक १० अ अनुसूचित जाती महिला ब पुरुष जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. नगरपरिषदेची एकूण सदस्य संख्या ही २० झाली असून, सर्वसाधारण पुरुषासाठी ९ जागा, सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा, अनुसूचित पुरुषासाठी १ जागा तर अनुसूचित महिलांसाठी २ जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर व माजी नगर सेवक व इचछूकांची उपस्थिती होती.

 
Top