उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  लातूर उच्च माध्यमिक मंडळात १२ वी परीक्षा निकालानंतर नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्हयातुन श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालय अव्वल ठरले आहे. १२ वी सायन्सच्या परीक्षेत ९० पेक्षा जास्त गुण घेतलेले ७० विद्यार्थी आहेत तर िवशेष प्रावण्यांसह उर्त्तीण विद्यार्थी ७७२ विद्यार्थी आहेत. या महाविद्यालचा एकुण निकाल ९९.६५ टक्के लागला आहे. उल्लेखणीय बाब म्हणजे वाणिज्य व कला शाखेचा निकाल ९७.६२ टक्के व ९०.३८ टक्के लागला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की,  लातूरच्या शाहु कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ९० टक्के पेंक्षा जास्त गुण घेतलेले १२ विद्यार्थी, तर दयानंद कॉलेज महाविद्यालयामध्ये ३ विद्यार्थी आहेत. विशेष प्रावीण्यासह उर्त्तीण विद्यार्थी राजर्षी शाहु कनिष्ठ महाविद्यालयात ४०१ विद्यार्थी आहेत. तर दयानंद सायन्स कॉलेजमध्ये ३०५ विद्यार्थी आहेत. नांदेडच्या यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात १६० विद्यार्थी आहेत. तर अहमदपुरच्या कनिष्ठ महाविद्यालयात ९ विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे भोसले कनिष्ठ महाविद्यालयात ग्रामीण व  कष्टकरी व शेतकऱ्यांची मुले शिकत आहेत. प्राध्यपकांचे अथक परिश्रम व प्रत्येक विद्यार्थ्यांचे शंका निरसण याच मुळे गुणवत्ता वाढत गेली, असेही पाटील यांनी संागितले. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणावर पुर्वीपासूनच भर दिला होता. त्यानंतरच शासनाचा निर्णय झाला. ११ वी व १२ वी या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या ३४० वेळा परिक्षा घेण्यात आल्या.यामुळेच मुलांना परीक्षेची भीती राहिली नाही. कांही पालक खर्च झेपवत नसताना आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी बाहेर गांवी पाठवितात. त्यामुळेच भोसले कनिष्ठ महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिध्द करून के.टी. पाटील पॅटर्न निर्माण केला आहे. वािणज्य शाखेचा निकाल चांगला लागत असल्यामुळे सनदी लेखापालचा पायाभुत अभ्यास ही सुरू केला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य एस.एस देशमुख, उपप्राचार्य घार्गे, नलवडे, फोटॉन प्रमु ख भगत आदी उपस्थित होते. दरम्यान प्रशिक कांबळे, अश्लेषा देशमुख, काजल भोसले, नम्रता गाडे, जव्हेरीया मोमीन आदी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

 
Top