उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवी दिल्लीचे भाजपा मीडियाप्रमुख नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने एक दिवसीय बंद पाळून देशाचे राष्ट्रपती व  केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने आज (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन पाठविण्यात आले. 

निवेदनावर मसूद शेख, समीयोद्दीन मशायक, खलिफा कुरेशी, असलम शेख, बिलाल तांबोळी, आयाज शेख, निजामोद्दीन मुजावर, बिलाल रजवी, अकबर पठाण, फैजान काझी, इस्माईल काझी, कादर खान, अ‍ॅड.जावेद काझी, वाजीद पठाण, शहेबाज शेख, मौलाना जाफर, असद पठाण, साजीद सय्यद, आरेफ शेख, शजियोद्दीन शेख, मेहराज बागवान, इम्तियाज बागवान, बाबा फैजोद्दीन शेख, हाजी खयामोद्दीन,सफराज पटेल, मौलाना अहमद, जाकेर पठाण, गयास मुल्ला, अल्लानूर शेख, जुल्फेकार काझी, एजाज काझी, बाबा मुजावर, फेरोज शेख, फेरोज पल्ला यांची स्वाक्षरी आहे.


 
Top