परंडा/प्रतिनिधी - 

भाजपा आपल्या गावी अभियानाची सुरुवात भाजपाचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार  सुजितसिंह ठाकूर  व  उस्मानबाद भाजपाचे नेते आमदार  राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आपल्या गावी या अभियानाची सुरुवात संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे.

  केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये अभियान प्रमुख  राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कात्राबाद व खासापुरीचे ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणी व श्री संत बाळुमामा दर्शनाने करण्यात आली याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना केंद्र सरकारच्या विविध जन कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. या अभियानास कात्राबाद व खासापुरी ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व विविध योजनांची माहिती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

     सदरील अभियानास भाजपाचे नेते डॉ. अमोल गोफणे, स्वानंद पवार, साहेबराव पाडुळे कात्राबाद चे सरपंच परशुराम कोळी भाजपाचे युवा नेते किरण देशमुख, प्रा. किरण गरड तसेच कात्राबाद व खासापुरीचे ग्रामस्थ हजर होते. 
Top