वाशी / प्रतिनिधी- 

     येथील  अजिंक्य विद्यामंदिर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे. अजिंक्य विद्यालयातून इयत्ता दहावी (S.S.C) बोर्ड परीक्षा मार्च 2022 चा निकाल एकूण 100% लागला आहे. 

 अजिंक्य विद्यालयातून पहिला क्रमांक - टेकाळे मंजिरी सुभाष - 94.20 दुसरा क्रमांक - जगताप वेदिका विवेकानंद - 93.40 तिसरा क्रमांक - डोके लक्ष्मी दगडु - 92.80,चौथा क्रमांक - मुळे वैष्णवी वसंत -92.40, पाचवा क्रमांक - चौधरी श्रुती अनिल -91.40 असे पाहिले पाच क्रमांक आसून एकूण 59 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या मधे सर्व विद्यार्थी चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यामधे 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 12 विद्यार्थी आसून 75% पेक्षा जास्त गुण घेतलेले एकूण 23 विद्यार्थी आहेत त्याच बरोबर 60% पेक्षा जास्त गुण घेणारे 24 विद्यार्थी आहेत  वरील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ. विजयाताई गायकवाड,उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, माजी  नगराध्यक्ष नितीन चेडे, नागनाथ नाईकवाडी,मु. अ.लक्ष्मीकांत पवार , श्री. एस. एल.पवार सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 


 
Top