वाशी  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील हातोला येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त तसेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये हातोला येथील 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व रक्तदात्यांना शिवसेनेचे वाशी उपतालुकाप्रमुख विकास तळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

यावेळी  पत्रकार बंडू मुळे,हातोला येथील ज्येष्ठ शिवसैनिक विवेक खवले, कानिफनाथ इंगोले,संजय खवले, विलास खवले, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य राजा कोळी, हातोला येथील दत्तू खवले, बाळासाहेब खवले,नवनाथ खवले,अच्युत खवले, जग्गू माने,  राजेश इंगोले,आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top