उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आर्य चाणक्य विद्यालयात शाळेतील महिला शिक्षिकांनी चार वर्षापूर्वी लावलेल्या वटवृक्षाची आज वटपौर्णिमेच्या निमीत्ताने विधीवत पूजा करून विद्यार्थी-विद्यार्थिनींना वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 शाळेतील शिक्षिकांनी मागील चार वर्षांपूर्वी वटपौर्णिमेला शाळेच्या परिसरात लावलेल्या वटवृक्षाची आज वटपौर्णिमेनिमित्त   पूजा करून शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचा कृतीतून संदेश दिला. यानिमित्ताने शाळेतील सर्व शिक्षिका सकाळी एकत्र येऊन त्यांनी शाळेच्या परिसरातील चार  वर्षांपूर्वी वटपौर्णिमेलाच लावलेल्या वटवृक्षाची विधिवत पूजा केली आणि निसर्गाप्रती आपला कृतज्ञताभाव व्यक्त केला. चार वर्षा पूर्वी लावलेल्या या वटवृक्षाचे संगोपन आणि जतन केलेला हा वटवृक्ष आता शाळेच्या परिसराची शोभा वाढवत आहे तसेच विद्यार्थ्यांना आणि शाळा परिसरात येणाऱ्या अभ्यागतांना सावली देत उभा आहे.

वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्याची पूजा करून या झाडाचे संगोपन करण्याचा तसेच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव यानिमित्ताने या महिला शिक्षिकांनी कृतीतून प्रकट केला आणि हा संस्कार विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनावर बिंबवण्याचा उपक्रम हाती घेतला.

 
Top