उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जगावर कोंवीड सारख्या आलेल्या संकटानंतर दोन वर्षानंतर यावर्षी हज यात्रा 2022 करिता उस्मानाबाद जिल्ह्यातून 78 नागरिक हज साठी जाणार आहेत , हज करताना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी त्यांना प्राथमिक माहिती दिली जाते त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद शहरात अंजुमन ए खादिमीन हुज्जाज तर्फे हज यात्रा , (प्रॅक्टिकल) प्रशिक्षण देण्यात आले

 या कार्यक्रमावेळी प्रमुख मार्गदर्शक हाफीज अफझल निजामी, हाफीज असलम सहाब,  कारी जैन उल आबिदीन, व अंजुमने खादिमिन हुज्जाज उस्मानाबाद चे हाजी शागीर्द अहेमद सर, हाजी मोईझोद्दीन रझवी ( बाबू सर ), डाॅ. सायम रजवी,हाजी दादा हवरे, गफ्फार शेख व साकिबी ग्रुप सदस्य व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top