उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ वी जयंती उस्मानाबाद शहरातील बौद्ध नगर या ठिकाणी १ वाजून ४८ मिनिट हा वेळ साधून साजरी करण्यात आली .दरम्यान यावेळी नागरिकांच्या वतीने त्यांच्या राहत असलेल्या बौद्ध नगरातील एका भागाला राजर्षी शाहू महाराज वसाहत हे नाव देऊन नामफलकाचे उद्घाटन  करण्यात आले . 

यावेळी राजर्षी शाहू महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बसपाचे संजय वाघमारे , काँग्रेस चे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे ,बहुजन एकता विकास परिषदेचे प्रशांत भय्या बनसोडे , आर पी आय चे सोमनाथ गायकवाड ,भीमशक्तीचे जिल्ह्याध्यक्ष मेसा जानराव ,संपत जानराव यांच्या हस्ते करण्यात आले .  त्यानंतर  मोती चूर लाडू वाटप करण्यात आले.   

यावेळी या  कार्यक्रमासाठी  सचिन दिलपाक, रवी प्रेमकांत माळाळे,मुकेश जानराव ,आकाश माळाळे,राजेंद्र दिलपाक , प्रेमकांत माळाळे,बालाजी शितोळे ,आनंद गाडे ,संतोष बनसोडे ,रावसाहेब मस्के ,सलीम शेख लहान मुले स्वरा गौतम दिलपाक,विश्वदीप कुंदन सुरते   इतर समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते .


 
Top