उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा न्यायालय शाखा उस्मानाबाद येथे जिल्हा शल्यचिकित्सक  डी.के.पाटील यांच्या सहकाऱ्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  केले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे वैशिष्ट म्हणजे या रक्तदान शिबिरात महिला रक्त दात्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथील रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी गोरे व त्यांच्या संपूर्ण टीमने पूर्ण वेळ उपस्थित राहून शिबिराच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिले.

या शिबिराचे नियोजन एस बी आय स्टाफ युनियनचे श्री.राहुल जोशी,जगदीश वीरकर,अभिजीत जेवळीकर, सिध्देश्वरप ्रसाद जोशी,अमोल घुगे व सागर तितरमारे यांनी पुढाकार घेऊन केले.


 
Top