तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तुळजापूर सोलापूर रस्त्यावर सांगवीमार्डी जवळ ऐकोणतीस वर्षिय   ज्ञानेश्वर नाना करांडे याची करण्यात आलेल्या निघृण हत्या प्रकरणी मयताचा मावास  भाऊच आरोपी निघाला आहे याचा शोधात दोन पथके रवाना झाले असुन तो लवकरच हाती लागेल अशी माहिती पो नि अदिनाथ काशीद यांनी दिले.

सदरील घटना ही नातेसंबधाला काळीमा फासणारी असुन मावस भाऊ बहीण भाऊ असा ञिकोणी सुञ या हत्या मागे असण्याचा पोलिसांचा संशय असुन हत्या सशियत   रामेश्वर संभाजी खोचरे केली असली तरी त्याला  हत्येसाठी त्याचा भाऊ बहीण वडील यांचे सहकार्य लाभले असण्याची शक्यता वार्तवली जात आहे. सध्या आरोपीची गावाजवळ असण्याची शक्यता गृहीत धरुन दोन पथके आरोपींचा शोधात आहेत.

सदरील हत्या हि मावस भाऊ व मावस  बहीणीशी असणाऱ्या अनैतिक संबधातुन झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.हे संबध एक प्लाँट देवुन   मिटवण्यायात  मावस भाऊ ज्ञानेश्वर  याचा सहभाग होता. त्यामुळे तुझ्यामुळे माझा प्लाँट गेल्याचा राग मनात धरुन ही रामेश्वर खोचरे यांनी ही  निघृण हत्या कोयत्याने केली आहे.असा संशय पोलिस व्यक्त करीत असुन त्यादृष्टीने तपास चालवला जात आहे.

 मयतावर मसलाखुर्द येथे पहाटे अंत्यसंस्कार 

ज्ञानेश्वर करांडे गावात महाबँक चालवत होता दिवसभर तुळजापूर येथे झेराँक्स दुकान चालवत होता. यांच्यावर शवविछेदना नंतर शुक्रवार दि.११ रोजी पहाटे २ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.मयताला पत्नी, एक मुलगी असुन मयताची पत्नी सध्या गरोदार असल्याचे समजते मयाताच्या पश्चात वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

 
Top