उस्मानाबाद / प्रतिनिधी-

“ए जे सोशल फौंउनडेशन च्या देवकार्य टीम” चे कोषाध्यक्ष त्रिशूल व्यंकटराव कोळी यांच्या संकल्पनेतून, “सिद्धिविनायक परिवार” या संस्थेस “लोटस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर” या नावाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी केंद्र सरकार कडून मान्यता प्राप्त झाल्याबद्दल सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक  दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा धन्वंतरी देवतेची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला,

तसेच ज्यावेळी हॉस्पिटल उभारेल त्या वेळी धन्वंतरी देवतेची मार्बल ची मूर्ती ए जे सोशल फौंउनडेशन तर्फे हॉस्पिटल ला भेट देण्यात येईल असे खात्रीपुरक आश्वासन दत्ताभाऊ कुलकर्णी यांना ए जे सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अनिरुद्ध जोशी यांनी दिले आणि हॉस्पिटल च्या उभारणी वेळी कोणतीही मदत लागली तर ए जे सोशल फाउंडेशन ची देवकार्य टीम आपल्या सोबत सदैव आहे असे हि सांगण्यात आले.यावेळी ए जे सोशल फाउंडेशन या संस्थेचे पदाधिकारी अजयकुमार कोळी,महिला सदस्य आशाताई कांबळे,कविता ताई काळे हजर होत्या.सिद्धिविनायक परिवार चे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी ए जे सोशल फौंउनडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांचे आभार मानले.    

 “लोटस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर” या वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात उस्मानाबाद जिल्हा वासीयांच्या सेवेत मल्टीस्पेशालीटी  हॉस्पिटल उभा करून समाजाच्या आवश्यकतेनुसार समाजातील सर्व घटकांना या दृष्टीने वैद्यकीय सेवा पुरवने,रुग्नावर आर्थिक बोजा न पडता त्याला योग्य तो उपचार मिळेल या साठी काम केले जाईल असेही दत्ता भाऊंनी सांगितले.

 
Top