वाशी / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवुन  देण्यासाठी  केलेले भाजपा ने केलेले प्रयत्न व राज्यातील महाविकासआघाडी  सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर प्रभावीपणे ठेवा असे  आवाहन  माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी  भाजपा आपल्या गावी अभियानाच्या आढावा बैठकीत बोलताना केले.  येथील भाजपा कार्यालयात रविवार (5) रोजी तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

भाजपा आपल्या गावी अभियानाच्या माध्यमातून आमदार राणादादा यांनी पीकविमा मिळवून देण्यासाठी  केलेली न्यायालयीन लढाई, केंद्र सरकारने सर्वसामान्यसाठी राबविलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती , पीक विमा, अतिवृष्टी आनुदान देण्यासंधरबात राज्यातील  महाविकास आघाडी सरकारकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक व त्यांचा नाकर्तेपणा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत  या अभियानातून पोहोचवने ही प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी असून ती पार पाडून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी केले. बैठकीला उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, एड. कुलदीपसिंह भोसले यांच्यासह नगरसेवक, सरपंच, ,तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top