उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनेने आतापर्यंत अनेक मोठमोठे धक्के पचविले आहेत. कितीतरी जणांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाही त्यात यश आले नाही.  यावेळेसही शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी उस्मानाबादच्या तमाम शिवसैनिकांची फौज भक्कमपणे उभी आहे. कोणी काहीही सांगून फूट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कायम शिवसेनेतच राहणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. तसेच शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख तथा आमदार मा.श्री.कैलास पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. 

उस्मानाबाद येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेचे तालुकप्रमुख  .सतीशकुमार सोमाणी व उपजिल्हाप्रमुख  विजयकुमार सस्ते यांच्या उपस्थितीत धाराशिव तालुक्यामधील शिवसेनेचे निष्ठावंत आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली. धाराशिव जिल्ह्यातील काही जणांनी शिवसेनेसोबत बंड करुन शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख तथा आमदार मा.श्री.कैलास पाटील यांच्यावर उलटसुलट आरोप करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांना वेळ आल्यावर सडेतोड उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री.सतीशकुमार सोमाणी यांनी दिला आहे. 

या बैठकीत अनेक शिवसैनिकांना आपल्या भावना व्यक्त करताना कंठ दाटून आला. शिवसेनेवर घाव घालण्याचा डाव अनेकवेळा झाला. पण त्या त्या वेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही कट्टर शिवसैनिकांनी तो हाणून पाडला आहे. यावेळेसही आपल्यातल्याच काही जणांना फूस लावून पक्षात आणीबाणीची स्थिती निर्माण करण्याचे षडयंत्र आखले आहे. त्यात सामील झालेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या आमदारांनी आमच्या नेतृत्वाला जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांना बदनाम करण्याचा डाव ते खेळत आहेत. पण आम्ही शिवसैनिक वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन त्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे शिवसैनिकांनी बैठकीत सांगितले. 

या बैठकीला धाराशिव शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख श्री विजय बापू सस्ते धाराशिव शिवसेनेचे तालुकाप्रमुख  सतिशकुमार सोमाणी मा.जिल्हा परिषद सदस्य श्री नितीन शेरखाने उस्मानाबाद शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख   राजनारायन कोळगे,  दादा कोळगे,  अण्णा पवार विभागप्रमुख  अमोल मुळे, मुकेश पाटील,  व्यंकट गुंड, दिनेश हेड्डा, गुणवंत देशमुख,  अनंत भक्ते, राजेंद्र भांगे, राजेंद्र तुपे, आबा सारडे, संजय खडके, विनोद पवार, शिवाजी सरडे, धनंजय इंगळे, सौदागर जगताप तसेच गण प्रमुख   संदीप गोफने , पोपट खरात, अनिल बागल,  विष्णू ढवळे, नेताजी गायकवाड,  गणेश सगर,  बालाजी जाधव , दळवे मंगेश,  ओंकार कुंभार,  शिवलाल कुऱ्हाडे नागेश घेवारे, संभाजी गोफने, ओंकार सारडे उपस्थित होते.


 
Top