उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक योग दिन संपन्न झाला .यावेळी योगाचार्य म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आनंद मोरे हे उपस्थित होते. संस्थेच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी ,कल्याणसागर समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, गटशिक्षण कार्यालयाचे श्री. गवळी सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .किरण आदिनाथ   गरड सर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून  योग दिनाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी योगाचार्य डॉक्टर आनंद मोरे यांनी भारतीय संस्कृती आणि योग याचे महत्त्व पटवून देत एका एका आसनांची माहिती व त्याचे प्रात्यक्षिक करून घेतले, त्याच बरोबर मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा किती महत्त्वाची आहे हेही यावेळी त्यांनी पटवून दिले . जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनासारख्या महामारीवरती योगा आणि ध्यान धारणा हा एकमेव रामबाण उपाय आहे हेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले .सरस्वती शाळेचे व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयांतील 350 विद्यार्थी , शिक्षक,  व पालक उपस्थित होते. सकाळच्या आनंदी वातावरणामध्ये हा योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 
Top