उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पक्षातील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सोबत २८ जण असून यातील १३ जण आमदार असल्याचं बोललं जात आहे.

दोन मंत्रीही गुजरातमध्ये

यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेले आहेत. 

या आमदारांचेही फोन नॉट रिचेबल

भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश शिंदे, महेंद्र थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, डॉ.बालाजी किणीकर, शहाजी बापू पाटील, मंत्री भुमरे आणि आमदार राजपूत यांचेही फोन नॉट रिचेबल असल्याने हे आमदारदेखील सुरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. तानाजी सावंत , उमरगा लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले हेदेखील नॉट रिचेबल आहेत. 


हॉटेलच्या सभोवताली प्रचंड पोलिस बंदोबस्त, मिलिंद नार्वेकर,रवी फाटक यांची एकनाथ शिंदे भेट घेणार नाहीत, शिंदे यांच्या सोबत असलेल्या सर्व आमदारांनी नार्वेकर यांची भेट घेण्याबाबत साशंकता, कर्नाटकचे आमदार महाराष्ट्राच्या हॉटेलात असताना शिवकुमार यांची भेट सर्वांनी नाकारली होती, तशीच परिस्थिती गुजरातमध्ये होण्याची शक्यता

शिंदे गटाचा दावा 

गटनेते पदावरून  शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना काढल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे एकुण् ३५ आमदार असून आपणच खरे गटनेता असल्याचे प्रतिक्रिया माध्यमाकडे दिली आहे. 

 
Top