उस्मानाबाद / प्रतिनिधी 

जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदावर कोणाची बदली होणार, याची उत्सुकता संपली असून चंद्रपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांची येथे बदली करण्यात आली. यापूर्वी येथे नियुक्ती केलेल्या अक्षय शिंदे यांना जालन्याला पाठवण्यात आले आहे.

यापूर्वीच्या पोलिस अधीक्षक निवा जैन यांची बदली नागपूरला झाल्यानंतर तेथील शहराचे पोलिस उपायुक्त अक्षय शिंदे यांनी बदली उस्मानाबादला झाली होती. परंतु, २ महिन्यांपासून ते रुजू झाले नाहीत. बदली आदेश निघाल्यानंतरही अनेक दिवस जैन नागपूरला गेल्या नाहीत. १५ दिवसांपूर्वी त्यांनी येथील पद सोडले.तेव्हाही शिंदे रूज झाले नाहीत. अखेर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार अतिरिक्त पुलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे देण्यात आला. बुधवारी अिधकृतरित्या गृह विभागाने शासननिर्णय निर्गमित करून कुलकर्णी यांची येथ्े नियुक्त केली. 


 
Top