तुळजापूर/ प्रतिनिधी-

नळदुर्ग शहर व परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने माजी उपजिल्हाप्रमुख  कमलाकर  चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे गद्दार आमदार तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले यांच्या पुतळ्याचे चावडी चौक ते एसटी स्टँड पर्यंत धिंड काढून त्यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी  बाळकृष्ण पाटील,  प्रदिप  मगर,सरदारसिंग ठाकूर, क्रष्णात मोरे, रक्षे,शाम माळी, रक्षे, संतोष पुदाले यांनी आपल्या भाषणात या गद्दार आमदारांचा तिव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला.

 या आंदोलनात   राजेंद्र  जाधव,  शाम कनकधर,  यशवंत पाटील,   शिवाजी कदम,  ज्ञानेश्वर भोसले,  मनोज कस्तुरे,  किलजचे दगडु नाना शिंदे, नंदगावचे परमेश्वर चिनगुंडे,सिध्देश कुंभार, बर्वे सर, अनिल छत्रे,बली मेनशेट्टी,चिवरीचे दत्ता भोसले, मकरंद भालकरे,सुर्यकांत घोडके, दयानंद घोडके,  सोमनाथ म्हेत्रे,  नेताजी महाबोले, मयूर हुलगे,भिमा कोळी, महादेव पवार,चंदर सगरे,राजु कोळी व नळदुर्ग व परिसरातील सर्व शिवसैनिक,नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. 

 
Top