उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष लक्ष आहे जिल्ह्यातील प्रमुख क्षेत्रात विकासासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद आपण करून घेऊ असे अभिवचन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिले.

 भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राणाजगजितसिंह पाटील हे होते तर राष्ट्रीय संघटनमंत्री दुष्यांतकुमार गौतम,माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अधिक बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा विशेषतः ॲनिमिया आणि बालकांमधील कुपोषणावर नियंत्रण, जिल्ह्यातील मुलींचे जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानावर आरोग्य यंत्रणेने आळा घालण्यासाठी जनजागृती करन्याची गरज बोलून दाखवली

तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय , जिल्हा रुग्णालयाचा विस्तार, ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे आणि जनजीवन मिशन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.

उस्मानाबाद जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा असल्याची ओळख पुसून विकसित जिल्हा करण्याच्या उद्देशाने सर्व यंत्रणांनी काम करण्याची गरज आहे. आरोग्य, जलसंधारण, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात केंद्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल.असेही ते म्हणाले. तसेच भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री दुष्यांतकुमार गौतम यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून झालेले निर्णय सांगितले,जनतेच्या चुलीपासून संरक्षणापर्यंत अन आरोग्यापासून रोजगार निर्मिती पर्यंत विचार करणारे नेतृत्व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आम्हाला लाभल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रसरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विकासयोजना जिल्ह्यात राबविणार असल्याचे म्हणाले तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केंद्रसरकारच्या योजनांचा अभ्यास करून त्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे हीच खरी लोकांची सेवा असल्याचे सांगितले.

 
Top