उमरगा / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिग्विजय कैलास शिंदे यांचा मुंबई येथील राष्ट्रवादी भवन घेते प्रदेशाध्यक्ष ना जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूकंप पुनर्वसन मंत्री ना संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजिराव गर्जे, हेमंत टकले ,जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, माजी आ . राहुल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह दि .१८ रोजी जाहीर प्रवेश संपन्न झाला .

  उस्मानाबाद जिल्हा भारतीय जनता पक्षाचा मातब्बर नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल होणार अशा स्वरूपाचे वृत्त काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते तर सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती .भारतीय जनता पक्षाचा युवा, मितभाषी चेहरा असलेले आणि जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती श्री . शिंदे यांच्या मुंबई येथे झालेल्या प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे .

   श्री शिंदे व त्यांच्या सह सर्व प्रवेश केलेल्या  कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक मिळेल असा शब्द उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी बोलताना दिला . तर मराठवाडा कृष्णा वॉटर ग्रीड टप्पा क्रमांक ६ जा सर्वे करून कामास त्वरित सुरू करण्याच्या जिल्हाध्यक्ष बिराजदार यांच्या मागणीला दुजोरा देत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना .पाटील यांनी कृष्णेचे पाणी दुष्काळी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला मिळण्यासाठी  येत्या दिड महिन्यात कामांना सुरुवात होईल . साधारण दोन वर्षात कामे पुर्ण होऊन उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळेल असे आश्वासन दिले . प्रास्ताविकात उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपा व इतर पक्षातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी विशेष वेळ काढावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी केली .

 उमरगा तालुक्यामध्ये कोरोना महामारी च्या काळामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी व शहराध्यक्ष खाजा मुजावर यांचा विषेश सत्कार करण्यात आला . तालुक्यातील माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष गुंडाप्पा झांबरे, डॉ . बाबासाहेब आंबेडकर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष धीरज कांबळे, भटक्या-विमुक्त संघाचे कार्याध्यक्ष बबन आयनीले , भारतीय दलित पॅंथरचे गगण सरपे एकोंडी सरपंच बाबासाहेब सोनकांबळे , बहुजन क्रांती मोर्चा चे युवक अध्यक्ष दिलीप माने राजस्थान युवा मंडळ तालुका अध्यक्ष विक्रम कुमावत शिवनेरी ग्रुप अध्यक्ष मिथुन पाटील, वडार समाज एकता संघटनेचे अध्यक्ष नागेश पाथरूट , निवृत्त अधीकारी मिलिंद कांबळे, डी.टी.कांबळे, आनंद पाटील ,गोपाळ घोडके, संग्राम नागणे, नागेश घोडके, विनोद घोडके ,अनिल चव्हाण ,हनुमंत दंडगुले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला .

     यावेळी जिल्हा परिषद गटनेते महेंद्र धुरगुडे, प्रविण यादव , तुषार वाघमारे,संजय पवार ,सुनील साळुंखे, भीमा स्वामी, बाळासाहेब स्वामी, शमशोद्वीन जमादार, धीरज बेळंबकर , अफसर मुल्ला ,आदींसह जिल्हा व तालुक्यातील अनेक पदाधीकारी उपस्थिती होते .

 
Top