वाशी/ प्रतिनिधी-

वाशी येथील शंकर महाराज थोबडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधे अखंड हरिनाम  सप्ताहाची सांगता नुकतीच करण्यात आली. या सप्ताहमधे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. 

     वाशी येथील श्री थोबडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधे ह.भ. प. शंकर महाराज थोबडे यांचे नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे  या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.  या सप्ताहाचे हे तेरावे वर्ष होते. या अखंड हरीनाम सप्ताहमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन हरिपाठ आणि संकिर्तन नंतर हरी जागराचे आयोजन करण्यात आले होते.  या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. ह. भ. प. मंगेश तथा बंडोपंत महाराज कोरे देगाव सोलापुर यांनी सुश्राव्य  असे काल्याचे कीर्तन केले. 

 या सप्ताहामध्ये वाशी मधील व भाविक भक्तांचे सहकार्य लाभले. काकड्याचे नेतृत्व ह. भ. प. भाऊसाहेब महाराज घुमरे यांनी केले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री अंकुशराव (तात्या) महामुनी यांनी तर  गाथाभजन ह. भ.प. चिदानंद महाराज काळजे यानी केले. हरिपाठ ची जबाबदारी श्री बबन विठ्ठल टकले यांनी पार पाडली. सप्ताहाच्या शेवटी ह. भ. प. शंकर महाराजय थोबडे यांनी सप्ताह आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. या बरोबरच नामस्मरणाची कास धरून स्वतः सुखी व समाधानी रहावे असे ही त्यांनी   सांगितले.

 
Top