परंडा / प्रतिनिधी : -

भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) सन २०२१-२२ च्या हिशोबाचे लेखा विवरणपत्र (स्लिपा) ३० जून ०२२ अखेरपर्यंत मिळाव्यात या मागणीचे निवेदन मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे,लेखा अधिकारी (सा.) वित्त विभाग श्रीकांत मोरे यांना देण्यात आले.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींचे उच्च शिक्षणासाठीची एडमिशनस साधारणपणे जुलै-ऑगस्ट मध्ये असल्याने पैशाची नितांत गरज असते, आपल्या हक्काचा पैसा वेळेवर मिळावा जेणेकरून मुलांचे एडमिशनस साठी कोणापुढे हात पसरण्याची वेळ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर येणार नाही.

तसेच बीडीएस वेतन प्रणाली शासन स्तरावरून वेळोवेळी बंद पडत असल्याने जीपीएफ रक्कम मागणी प्रस्ताव मंजूरीस विलंब होऊ शकतो, याचा विचार करता जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांचे कडून तालुका निहाय शिक्षकांचे जीपीएफ स्लिप मागणी यादी मागवून घ्यावी व वेळेत जीपीएफ स्लिपा मिळतील याचे नियोजन व्हावे.

 या विषयावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे,लेखा अधिकारी (सा.) वित्त विभाग जि.प.उस्मानाबाद श्रीकांत मोरे यांचे समवेत सकारात्मक चर्चा होऊन जीपीएफ स्लिपा लेखा विवरणपत्र तयार करण्याचे काम ९०-९५ टक्के पुर्ण होत आले आहे. तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका अंतर्गत सर्व शिक्षकांची जीपीएफ स्लिपा मागणी यादी लवकरात लवकर जिल्हा एफडी विभागाकडे सादर करावेत जेणेकरून मागणीनुसार स्लिपा तालुकानिहाय देता येतील. तसेच तालुका स्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत वेळेत जीपीएफ स्लिपा मागणी याद्या जिल्हा एफडी विभागाकडे सादर करण्याचे अनुषंगाने प्रहार संघटनेने पाठपुरावा करावा याबाबी चर्चील्या गेल्या.

निवेदन देतेवेळी प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतुक कडमपल्ले आदि.पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top