उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राजर्षी छत्रपती शाहु महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव समिती जयंती अध्यक्ष पदी शुभम रणजित मुंडे तर उपाध्यक्ष पदी स्वप्निल शिंगाडे यांची निवड करण्यात आली.

 छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह , उस्मानाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शाहू महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले व छत्रपती शाहु महाराज चौकाचे सुशोभीकरण करणे या विषयी चर्चा करण्यात आली . राजर्षी छत्रपती शाहु महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव समिती,उस्मानाबाद ची कार्यकारिणीची निवड करण्यात आली . 

यावेळी अध्यक्ष पदी शुभम रणजित मुंडे , उपाध्यक्ष पदी स्वप्निल शिंगाडे तर सचिव पदी बिलाल रझवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . यावेळी प्रस्तावना छ.शाहु महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी केली . बालाजी तांबे सचिव , राजसिंहा राजेनिंबाळकर , महादेव माळी , मोहन मुंडे , कुणाल निंबाळकर , मनोज मुदगल , प्रशांत साळुंके , अग्निवेश शिंदे , पवन सुर्यवंशी सर , राहुल गवळी , अनंत जगताप , महेश उपासे , उध्दव कसबे , विजय गायकवाड , अजित माळी , प्रविण कुलकर्णी , अभिजीत सुर्यवंशी , प्रदिप सुर्यवंशी , प्रसाद मुंडे , धनराज नवले , सार्थककुमार पाटील , महेश रंगदळ , सुरज लोंढे आदी बैठकीस उपस्थित होते या बैठकीस उपस्थितांचे आभार आकाश मुंडे यांनी मानले .

 
Top