उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यात 61 मतदार संघ असणार आहे. या प्रारूप आराखड्यावर 8 जुन पर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा आराखडा जाहीर केला आहे. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 14 मतदार संघ असून कळंब व उमरगा तालुक्यात प्रत्येकी 9 गट, भूम तालुक्यात 5 व परंडा तालुक्यात 6 गट, तुळजापूर तालुक्यात 10, वाशी तालुक्यात 3 तर लोहारा तालुक्यात 5 गट असणार आहेत.

भूम तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट असून त्यात ईट, देवळाली, पाथरूड, वालवड, माणकेश्वर यांचा समावेश आहे. वाशी तालुक्यात पारा, पारगाव व तेरखेडा हे 3 गट असणार आहेत. कळंब तालुक्यात ईटकुर, मंगरूळ, डिकसळ, शिराढोण, नायगाव, देवळाली, खामसवाडी, मोहा व येरमाळा या 9 गटांचा समावेश असणार आहे. 

उस्मानाबाद तालुक्यात ढोकी, जागजी, कोंड ,तेर, आळणी, येडशी,उपळा, सारोळा,पाडोळी, बेंबळी, सांजा, कारी,केशेगाव व करजखेडा या 14 गटाचा समावेश आहे. परांडा तालुक्यात शेळगाव, अनाळा, डोजा, खासापुरी, जवळा व आसू या 6 गटाचा समावेश आहे. तुळजापूर तालुक्यात सिंदफळ, काक्रंबा, जळकोट, अणदूर, मंगरूळ, काटी, तामलवाडी, काटगाव, खुदावाडी व नांदगाव या 10 गटांचा समावेश आहे.

लोहारा तालुक्यात 5 गट असून कानेगाव, माकणी, सास्तूर, जेवळी व आष्टा कासार या गटाचा समावेश आहे तर उमरगा तालुक्यात 9 गट असून त्यात पेटसांगवी, तलमोड, बलसूर, येणेगूर, दाळिंब, गुंजोटी, तुरोरी, कदेर व आलूर या गटाचा समावेश आहे.

 
Top