उस्मानाबाद / प्रतिनिधी-

’जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 26 योजनांचा कृती आराखडा सादर करण्यात आला होता. यापैकी 21 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे .या 21 योजनांच्या 21 .12 कोटी रुपयांच्या आराखड्यांना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्र.1 चे सलीम आवटे, कार्यकारी अभियंता जिवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा तथा जिल्हा पाणी व स्वच्छ्ता मिशनचे सदस्य सचिव अर्जुन नाडगौडा, वरिष्ट  भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड आदी उपस्थित होते.

        केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या कार्यरत मार्गदर्शक सूचनांनुसार 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक, घरगुती नळजोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे.याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कृती आराखड्यातील 26 पैकी 21 योजनांचे अंदाज पत्रकांना जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी मान्यता दिली. या 21 योजनांसाठी 21.12 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित पाच योजनांसाठी गावांची लोकसंख्या कमी आहे. दरडोई खर्च शसनाच्या निकषापेक्षा जास्त येत आहे. त्यामुळे शासनाची मान्यता घेणे आवश्यक असल्याने या पाच योजनांची शासनाकडे मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे.

 
Top