तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री संत गोरोबा काका अन्नक्षेत्र सेवा मंडळ श्री क्षेत्र तेर (ता. जि. उस्मानाबाद )  यांच्या वतीने पत्रकार दादासाहेब काडगावकर यांना सामाजिक आणि पत्रकारितेमधील कार्याबद्दल गौरव  पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सामाजिक-धार्मिक बातम्या बरोबरच  परिसरातील अडचणीबाबत बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत असल्यामुळे त्यांचा हभप डॉ. ईश्वरराव शास्त्री महाराज, हभप आबा लिंगफोडे महाराज, हभप एकनाथ हुरडे महाराज, कुंभार समाज सेवाभावी संस्थेचे  तालुका अध्यक्ष भागवत कुंभार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी तानाजी गवळी, पोपट पाटील, आबा ताटे, अण्णासाहेब गोरे ,अनिल माळी, किशोर कुंभार अंगद माळी मोहन कुंभार अतिश कुंभार यांच्यासह सावरगाव ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top