तेर / प्रतिनिधी

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्पाअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील आठ गावाची निवड झाली असल्याची माहिती तेरचे मंडळ कृषी अधिकारी एस.जी. देशमुख यांनी दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी ,सारोळा, वाडीबामणी ,बेंबळी ,पोहनेर, चिलवडी, कसबे तडवळा, गोवर्धनवाडी या गावाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गावात शंभर हेक्टरवर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक  हेक्टरी  साडेसहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती तेरचे कृषी मंडळ अधिकारी एस .जी. देशमुख यांनी दिली.

 
Top