तुळजापूर / प्रतिनिधी

बालाघाट शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकरराव देवराव चव्हाण आणि सचिवपदी उल्हासदादा नरेंद्र बोरगावकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.  ५ मे रोजी झालेल्या संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.

बालघट शिक्षण संस्था नळदुर्ग कार्यकारिणीची बैठक नळदुर्ग येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ५  मे रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी मधुकरराव देवराव चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभयकुमार शहापूरकर,  कार्याध्यक्षपदी नरेंद्र बाबुराव बोरगावकर व रामचंद्र बसवणप्पा आलूरे, सचिवपदी उल्हासदादा नरेंद्र बोरगावकर, सहसचिव म्हणून प्रकाश बसप्पा चौगुले शहाबाज अबुलउल्लम काझी, लिंबराज तातेराव कोरेकर, कोषाध्यक्षपदी प्रदीप  मंटगे, कार्यकारिणी सदस्य म्हणून बाबूराव मधुकराव चव्हाण, अशोक रामभाऊ पुदाले, पदसिध्द सदस्य म्हणून प्राचार्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग,  प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांची निवड या बैठकीत करण्यात आली आहे.

 
Top