उमरगा / प्रतिनिधी-   

तालुक्यातील चिंचोली भुयार येथील रामा मल्लू धनगर (धुळे) यांचे कुळ सात बारा उताऱ्यातील इतर अधिकरातील नोंद असलेल्या जमिनीची रजिस्ट्री केली.यांची  कब्जेदारांना कसलीच माहिती तहसिल कार्यालयाने  यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर दि. पाच एफ्रिल 21  रोजी जमिन खरेदी विक्री नाहरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे कुळाचे नाव रामा मल्लू धनगर घुळे याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे  दोन मे रोजी सोमवारी तहसील कार्यालया समोर गौतमी बाई मल्हाररावं होळकर बहुउद्धेशिय महिला मंडळाच्या वतीने  उपोषण करण्यात आले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पाच एफ्रिल 21 रोजी  तहसिल कार्यालयाचे महसुल 2 चे नायब तहसिलदार डॉ. रोहन काळे यांना अधिकार नसताना  आर्थिक देवाण घेवाण करून जमिन खरेदी विक्री नाहरकत असले बाबत प्रमाणपत्र पारित केल्यामुळे त्यांना अटक करून गुन्हा दाखल करावा, रजिस्ट्री कार्यालयाचे नोंदणी अधिकारी यांनी 712 उताऱ्यातील इतर अधिकारातील रामा मल्लू धनगर यांची कुळ असलेल्या नावाकडे दुर्लक्ष करून खरेदीखत केल्यामुळे त्यांना निलंबित करून गुन्हे दाखल  करावेत.तलाठी कार्यालय सज्जा चिंचोली भूयार चे तत्कालिन तलाठी व नारंगवाङी विभागाचे मंडळ अधिकारी पी.जी. कोकणे आदींनी 

खोट्या कागदपत्राच्या आधारे मंजुर केलेला आहे.या बाबत  उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उमरगा यांचेकडे चार मार्च 22 रोजी . वरील जमिनीची सुनावणी चालू असताना फेर क्र.1743 व 1744 फेर स्थगिती ठेवणे संबंधी व लेखी पत्र देवून सुद्धा डाळिंब विभागाचे मंडळ अधिकारी यमुलवाड एम.के यांनी वरील फेरफार मंजुर केले आहे.आदी मागण्या साठी अंदोलन करण्यात आले. यावेळी  सौ. गौतमीबाई मल्हारराव होळकर बहुउद्देशिय महिला मंडळ आध्यक्ष कालिंदा घोडके, सुरेश गणापता धुळे  तुकाराम माणिक घुळे, कोंडीबा गोविदा घळे, गुरूनाथ तुकाराम घळे,विरभद्र विश्वनाथ घळे, डिगंबर खंडू घुळे, लक्ष्मण काशिनाथ घुळे, आदींनी सहभाग घेतला होता.

 
Top