उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिन  आज दिनांक 31 मे 2022 रोजी साजरा करण्यात आला.

 यावेळी डॉ जीवन वायदंडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कळंब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास डॉ रामकृष्ण लोंढे आय एम ए माजी प्रदेशाध्यक्ष,डॉ शोभा वायदंडे , डॉ पुरुषोत्तम पाटील, डॉ मयूर बिदरकर, डॉ स्वप्नील शिंदे इ. उपस्थित होते.

तसेच श्री तानाजी कदम एनसीडी समुपदेशक यांनी उपस्थितांना  तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती सांगून जागतिक तंबाखू विरोधी दिनाची शपथ दिली. 

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनंदा गोस्वामी, शामल गोसावी, जयश्री शिंदे, प्रगती भंडारी, प्रतिभा अंधारे, चंद्रभागा हंगे, ईश्वर भोसले, यशोदा महतो, परशुराम कोळी, शिवशंकर वीर ललिता राठोड, मंगल लोंढे, संध्याराणी कोळी, दत्तप्रसाद हेड्डा, भाऊ वाघचौरे, सौरभ जोशी, लक्ष्मीकांत मुंडे, विजय कुमार यादव, प्रवीण पारवे, विठ्ठल मोरे, हरिदास बारगुले  यांचे सहकार्य लाभले.

 
Top